Sunday, October 28, 2012

Code


दिवाळीची खरेदी चालू होती. आत दुकानात गर्दी होती म्हणून मी आणि मृण्मय दुकानाबाहेर बसलो होतो. मृण्मयची बडबड सुरु होती. 
मृण्मय: बाबा, मला आत आईकडे जायचे आहे.
मी: अरे, आई ड्रेस ट्राय करते आहे. थांब इथेच...
मृण्मय: तुला कसे माहित?
मी: आईने सांगितले...
मृण्मय: का?
मी: अरे मी आणि आई सगळं सांगतो ना एकमेकांना..
मृण्मय: मग मला का नाही सांगत तुम्ही?
मी: अरे तुला कळत नाही ना अजून सगळे... थोडा मोठा झालास की सांगू..
मृण्मय: कळते मला...
मी: मी ऑफिसचे नाही कि नाही सांगत सगळे..
मृण्मय: सांग ना.. कळते मला..
मी: मी ऑफिसमधे कोड लिहितो ना, ते कसे कळणार तुला...
मृण्मय: कळले मला..
मी: काय? (मी कनफ्युज्ड...)
मृण्मय: अरे, एक ब्लॉक असतो. त्याच्या खाली लिहिलेले असते कि काय लिहायचे आहे त्या ब्लॉक मधे
(Getting more and more confused)
मृण्मय: त्या ब्लॉकमधे काही ब्लॅक असतात आणि काही व्हाईट असतात. ब्लॅकमधे काही लिहायचे नसते..
आणि मी कपाळावर हात मारून घेतला!!


Wednesday, August 1, 2012

चाफा


"फुले घ्या फुले! चाफ्याची फुले... ५ पैशाला एक!!' 

साधारणपणे २०-२५ वर्षांपुर्वीची हि आठवण...

साधारणपणे 7 ते 8 वर्षाचा एक मुलगा सकाळी ७-७:१५ पासून ८ वाजेपर्यंत ओरडत असायचा. सुरुवातीला कुतूहल म्हणून लोक येवून बघायचे कि कसली फुले आहेत ते. कशी आहेत ते. त्यातून काही नेहेमीचे customer झाले. दिवसांमागून दिवस गेले. 5 पैशाची फुले रुपयाला 10, मग रुपयाला 6 अशी महाग होत गेली.. मग हळूहळू तो मुलगा अभ्यासात busy झाला. पण लोक केवळ चाफ्याच्या आठवणीने विचारत यायचे.. फुले आहेत का म्हणून...  रोजच्या रोज येणारे पोतदार आजोबा, इनामदार आजोबा, श्रावण सुरु व्हायच्या आधी "booking" करून ठेवणारे जैन आजोबा आणि असे कित्येक लोक ... 

तुमच्या लक्षात आले असेलच कि तो मुलगा दुसरा-तिसरा कोणी नसून अस्मादिकच होते!! 

आता मागे वळून बघताना वाटते खरंच मी दारासमोर उभा राहून फुले विकत होतो का? सुरुवातीला जरा संकोच वाटत होता, पण हळू-हळू सवय झाली आणि मग मजा पण यायला लागली. आई-दादा भल्या पहाटे उठून गच्चीवर जावून चाफ्याची फुले काढायचे. हाताला येतील तेवढी मी पण काढायचो. प्रथम ज्यांचे booking असेल त्यांच्यासाठी फुले बाजूला काढून  ठेवायची आणि उरलेली घेवून लगेच विकायला पळायचे. शाळा-class ची वेळ होइपर्यंत  जमतील तेव्हढी विकायची आणि मग उरलेल्या फुलांसाठी पाटी लावून ठेवायची !! त्यात एखादा दिवस असा यायचा कि फुले फारशी निघायची नाहीत किंवा पाऊस खूप असायचा.. मग लोकांना समजावता समजावता नाकी-नऊ यायचे.. त्यांना वाटायचे की booking करूनही आम्ही त्यांच्यासाठी फुले ठेवली नाहीत सगळीच पंचाईत .. एखादे फुल तोडताना फांदी तुटली तर वाटणारी हळहळ, झाडावरच्या कळ्या बघून दुसऱ्या दिवशी किती फुले येतील याचा अंदाज करायचा..फुले कमी झाली कि झाडाची छाटणी करून घ्यायची... दुसऱ्या मजल्यावरच्या गच्चीवरून फुले खाली सोडण्यासाठी केलेली युक्ती - दोरीला plastic ची पिशवी बांधून त्यातून फुले खाली सोडायची... एक न अनेक आठवणी!!

त्या फुले विकण्याच्या अनुभवाचा एक फायदा नक्की झाला - भीड चेपली. आणि आता वाटते त्याचा गेल्या 10-12 वर्षात कुठे-ना-कुठेतरी नक्की उपयोग झाला आहे. 

आज हे सगळे आठवायचे कारण म्हणजे गेले 2 दिवस office मध्ये एकजण त्याच्या घरची चाफ्याची फुले घेवून येत आहे ... सगळ्या आठवणी जाग्या झाल्या!!

Wednesday, April 11, 2012

बोलती बंद!!


मेघना: चला, जेवायला बसू यात...
मंदार: हो, चला, वेळ  झाली जेवायची...
मृण्मय: नाSSSहीSSS
मेघना डायनिंग टेबलकडे जाताजाता... मीच पहिली, मीच पहिली.. 

पहिला माझा नंबर 
पेढे खाऊ शंभर!!

मृण्मय (जागचा अजिबात न हलता...): ए आई, शंभर पेढे खाल्लेस तर पोट दुखेल तुझे!!! :)

Wednesday, February 22, 2012

Bournvita Boy!!

गेले काही दिवस मी आणि मृण्मय रोज सकाळी उठल्यावर laptop वर "बातम्या" वाचतो. म्हणजे मी त्याला वाचून दाखवतो. मग यात काही Videos असतात, काही photos असतात. कधी कधी नुसतेच त्याला वाचून दाखवतो.


आज सकाळी पण e-paper वाचत होतो. कालच्या भारत- श्रीलंका match ची बातमी बघत होतो. त्या पानावर match चे फोटो नव्हते. त्यामुळे मृण्मयला काही फारशी मजा येत नव्हती. मला काहीतरी करून त्याचे लक्ष दुसरीकडे वळवायचे होते, किंवा त्याला पटवायचे होते कि "It's okay not to have photos once in a while". 


तेव्हढ्यात मेघना तिथे आली. 


मी: अगं आई, match चे photos च नाही आहेत. 
मृण्मय: हो ना...
मी: अरे, आपण match हरलो ना म्हणून फोटो दिले नसतील त्यांनी... पेपरवाल्यानी..
...
...
...
"अरे, पण मग श्रीलंकेचे फोटो द्यायचे ना!!!"
My Bournvita boy quipped :D 


Sunday, February 5, 2012

Why this Kolaveri...

रात्रीच्या जेवणाची वेळ. टि.व्हि.वर सोनी मिक्स चालु होते - Best of 90's. I think KKHH चे कुठले तरी गाणे चालू होते. मी सहजच म्हणालो -
"त्या वेळेस मोठे लोक म्हणायचे कि काय हि आज कालची गाणी... आमच्या वेळेस असे नव्हते .. आमच्या वेळची गाणी  म्हणजे .... (चालू.....)"
मेघना मागून म्हणाली "हो न... काय ही आज कालची गाणी... शीला कि जवानी .. चमेली...
मी: अगं एव्हढे पण काही वाईट नाही आहे... खूप छान छान गाणी आज पण येतात... and then I gave couple of examples... माझे सध्याचे favorite - "बिन तेरे, कोई खलीश ही हवाओमे", and then another one from Singham - "बदमाश दिल ये जिद पे अडा" ... 
...
...
आणि अचानक मृण्मय सुरु झाला .. "why this kolaveri kolaveri..." आई हे पण आहे कि नाही छान...

And there was a blast of laughter in the dining room... :D