"फुले घ्या फुले! चाफ्याची फुले... ५ पैशाला एक!!'
साधारणपणे २०-२५ वर्षांपुर्वीची हि आठवण...
साधारणपणे 7 ते 8 वर्षाचा एक मुलगा सकाळी ७-७:१५ पासून ८ वाजेपर्यंत ओरडत असायचा. सुरुवातीला कुतूहल म्हणून लोक येवून बघायचे कि कसली फुले आहेत ते. कशी आहेत ते. त्यातून काही नेहेमीचे customer झाले. दिवसांमागून दिवस गेले. 5 पैशाची फुले रुपयाला 10, मग रुपयाला 6 अशी महाग होत गेली.. मग हळूहळू तो मुलगा अभ्यासात busy झाला. पण लोक केवळ चाफ्याच्या आठवणीने विचारत यायचे.. फुले आहेत का म्हणून... रोजच्या रोज येणारे पोतदार आजोबा, इनामदार आजोबा, श्रावण सुरु व्हायच्या आधी "booking" करून ठेवणारे जैन आजोबा आणि असे कित्येक लोक ...
तुमच्या लक्षात आले असेलच कि तो मुलगा दुसरा-तिसरा कोणी नसून अस्मादिकच होते!!
आता मागे वळून बघताना वाटते खरंच मी दारासमोर उभा राहून फुले विकत होतो का? सुरुवातीला जरा संकोच वाटत होता, पण हळू-हळू सवय झाली आणि मग मजा पण यायला लागली. आई-दादा भल्या पहाटे उठून गच्चीवर जावून चाफ्याची फुले काढायचे. हाताला येतील तेवढी मी पण काढायचो. प्रथम ज्यांचे booking असेल त्यांच्यासाठी फुले बाजूला काढून ठेवायची आणि उरलेली घेवून लगेच विकायला पळायचे. शाळा-class ची वेळ होइपर्यंत जमतील तेव्हढी विकायची आणि मग उरलेल्या फुलांसाठी पाटी लावून ठेवायची !! त्यात एखादा दिवस असा यायचा कि फुले फारशी निघायची नाहीत किंवा पाऊस खूप असायचा.. मग लोकांना समजावता समजावता नाकी-नऊ यायचे.. त्यांना वाटायचे की booking करूनही आम्ही त्यांच्यासाठी फुले ठेवली नाहीत सगळीच पंचाईत .. एखादे फुल तोडताना फांदी तुटली तर वाटणारी हळहळ, झाडावरच्या कळ्या बघून दुसऱ्या दिवशी किती फुले येतील याचा अंदाज करायचा..फुले कमी झाली कि झाडाची छाटणी करून घ्यायची... दुसऱ्या मजल्यावरच्या गच्चीवरून फुले खाली सोडण्यासाठी केलेली युक्ती - दोरीला plastic ची पिशवी बांधून त्यातून फुले खाली सोडायची... एक न अनेक आठवणी!!
त्या फुले विकण्याच्या अनुभवाचा एक फायदा नक्की झाला - भीड चेपली. आणि आता वाटते त्याचा गेल्या 10-12 वर्षात कुठे-ना-कुठेतरी नक्की उपयोग झाला आहे.
आज हे सगळे आठवायचे कारण म्हणजे गेले 2 दिवस office मध्ये एकजण त्याच्या घरची चाफ्याची फुले घेवून येत आहे ... सगळ्या आठवणी जाग्या झाल्या!!
2 comments:
Mandar Its your story.....?
Yes Amrut :)
Post a Comment