हात थरथरत आहेत लिहिताना, डोळ्यात पाणी आहे. मनात अपराधीपणाची भावना.
आज गुरुपौर्णिमा. बऱ्याच वर्षांनी शनिवारचा योग जुळून आला. त्यात मृण्मयने पण त्याच्या teacher ना भेटायचे ठरवले. मी पण बेत पक्का केला - माझ्या शिक्षकांना - फडके बाईना भेटून यायचे. मृण्मयच्या सोनाली teacher ना भेटून झाल्यावर मी आणि मृण्मय पोहोचलो शनिपाराजवळ - बाईंच्या घरपाशी .
सोसायटीच्या गेटमधून आत शिरलो. मनात धाकधुक होती . बऱ्याच वर्षांनी चाललो होतो. बिल्डींगच्या खाली पोहोचलो आणि gallery चे दार बंद दिसले. not a good sign. तसाच वर पोहोचलो. दार बंद. दाराबाहेरचा चप्पल stand नव्हता. तेवढ्यात एक आजी दिसल्या. घाबरत घाबरतच विचारले त्यांना - फडके बाई कुठे आहेत? आजी अवाक झाल्या.. हळुच म्हणाल्या - अरे दोन अडीच वर्षे झाली त्यांना जावून. . .
पायातले त्राणच गेले. कसाबसा खाली उतरलो आणि समोरच्या कट्ट्यावर बसलो. डोळ्यातले पाणी बघून मृण्मयला प्रश्न पडला होता बाबाला काय झाले म्हणून . .
फडके बाईंना मृण्मयला भेटायचे होते. मागच्या वेळेस एकटाच गेले होतो तेव्हा रागावल्या होत्या. नंतर नाहीच जमले. कारणे काहिही असोत, जमले नाही हेच खरे. कायमची टोचणी लागून राहणार आहे ही …
न.फ. - माझ्या दुसरी आणि तिसरीच्या वर्ग शिक्षिका. खूप कडक आणि शिस्तप्रिय. मुले खूप घाबरून असायची. दुसऱ्या वर्गातली मुले आमच्या वर्गात यायला घाबरायची. पण शिकवायच्या मस्त. मला मात्र खूप आवडायच्या. दोन्ही वर्षी भरघोस यश मिळाले. तिसरीत तर पूर्ण इयत्तेत पहिला आलो. त्यामुळे जास्तच आवडायला लागल्या. पुढे माध्यमिक शाळेत गेलो तरी बऱ्याच वेळा गुरुपौर्णिमेला जाणे व्हायचे. दहावी, बारावी, engineering - प्रत्येक वेळेस पेढे घेवून पोहोचलो आणि बाईंच्या चेहेऱ्यावरचा आनंद बघून आणखीनच खूष झालो. आमच्या कडच्या सगळ्या मोठ्या कार्यक्रमांना बाईंनी आवर्जून हजेरी लावली होती. दर वेळी त्यांच्याकडे गेले कि बाई नेमक्या हळिवाचा किंवा डिंकाचा लाडु द्यायच्या (जो मला आजिबात आवडत नाही .. आणि तरीही मी खायचो!) शेवटी एकदा सांगितले कि नाही आवडत मला त्यानंतर मात्र चिवड्याची वाटी पुढे यायला लागली :)
आज मृण्मयला भेटवायचे होते त्यांना .. राहून गेले … आता कायमचेच …
बाई - जाताना पण शिकवून गेलात - "Do things on time." सारखे वाटते आहे दर वर्षी एक दिवस तरी भेटून यायला पाहीजे होते न चुकता .. आता काही उपयोग नाही त्या वाटण्याचा ..
आयुष्यभर लक्षात ठेवणार आहे आणि हीच तुम्हाला श्रद्धांजली …

1 comment:
apratim mandar
Post a Comment