हिरव्यागार रानात, वाटे तुझ्यासवे जावे,
निळ्याशार तलावात पाय बुडवून बसावे,
तुझ्या नितळ गालावर पाणी उडवावे,
आणि त्या थेंबांचे मोती होताना बघावे.
दुरवर आकाशात, तुझ्यासवे भरारी घ्यावी,
ढगांवर स्वार होवून स्वर्गाची सैर करावी,
अवकाशातील तारकांची छान माळ करावी,
आणि तुझ्या गोर्यापान गळ्यात घालावी
छोट्याश्या बोटीत बसून समुद्रावर जावे,
अथांग सागरासारख्या तुझ्या प्रेमात बुडावे,
सागरामध्ये खूप खूप खोल शिरावे,
शंखशिंपल्यांच्या दागिन्यांनी तुला सजवावे,
गुलाबी थंडीत, तुझ्या कुशीत शिरावे,
काळ्याभोर केशसंभारात हात गुंफावे,
तुझ्या टपोरी डोळ्यात हरवून जावे,
देवाजवळ एकच प्रार्थना, हे सगळे खरे व्हावे
No comments:
Post a Comment